Dr Anil Roy : महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह परिवारावर हल्ला

एमपीसी न्यूज : दांडियासाठी लावलेले मंडप काढताना झालेल्या वादातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह कुटुंबीयांवर हल्ला झाला आहे.(Dr Anil Roy) यात रॉय यांच्यासह 3 ते 4 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. हा प्रकार आज (गुरुवारी) रात्री काळभोरनगर येथे घडला.

Guardian Minister Chandrakant Patil: आगामी काळात पुण्यात लोकहितासाठी आणि पक्ष मजबूतीसाठी काम करणार – पालकमंत्री आ.चंद्रकांतदादा पाटील  

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काळभोरनगर येथील मांडव काढण्याचे काम सुरू होते. मांडववाल्याचे पार्किंगवरून रॉय यांच्या कुटुंबातील महिला सदस्यासोबत भांडण झाले. (Dr.Anil Roy) त्यावरून बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.  मंडपवाल्याने मुले बोलावून घेवून डॉ. रॉय यांच्यावर हल्ला केला. त्यात 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. सर्वजण पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.