एमपीसी न्यूज : शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरीचा निषेध करत आज कोथरूड येथील कर्वे पुतळा येथे निदर्शने केली. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी बंडखोरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शहरात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत.
Eknath Shinde : बंडखोर आमदारांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा
‘शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्यांचे काय झाले ते आम्ही पाहिले आहे. त्यामुळे या आमदारांना त्रास सहन करावा लागणार आहे. या आमदारांचे महाराष्ट्रात पुन्हा कसे स्वागत होईल, हेही पाहावे लागेल, असे सुतार म्हणाले.
दरम्यान, येरवड्यात शिवसेनेचे (Eknath Shinde) माजी नगरसेवक संजय भोसले यांच्यासह शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळून निषेध केला.
Vijay Gupta : पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही – विजय गुप्ता