Election 2024 : निवडणूकीत विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून होणार नेमणूक

एमपीसी न्यूज – यावेळी होणाऱ्या निवडणूकांमध्ये अभिनव कल्पना (Election 2024)राबविण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी त्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर त्यांना विविध बाबींसाठी स्वयंसेवक म्हणून कामाची संधी दिली जाणार आहे.

तसेच मतमोजणीच्या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून (Election 2024)संधी दिल्या जाणार आहेत. त्याबद्दल त्यांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहेत, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

‘मराठी भाषा गौरव दिन’ व ‘जागतिक एनजीओ दिना’निमित्त राज्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच वर्शिप अर्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, पुण्याच्या स्वीप समनव्य अधिकारी अर्चना तांबे यांच्यासह जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, स्वीप समनव्य अधिकारी, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष पराग मते, व्यवस्थापकीय संचालक तेजस गुजराथी, निवडणूक साक्षरता मंडळ राज्य समन्वयक अल्ताफ पिरजादे तसेच व जिल्हास्तरीय समन्वयक तसेच विविध जिल्ह्यातील सुमारे 450 मुख्याध्यापक, प्राचार्य, नोडल अधिकारी उपस्थित होते.

Alandi : एमआयटी महाविद्यालयामध्ये डॉ. विश्वनाथ कराड करंडक 2024 जल्लोषात साजरा

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, मागील वर्षभरात निवडणूक साक्षरता मंडळद्वारे मतदारनोंदणीसाठी तसेच अन्य उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना अद्यापही 10 मार्चपर्यंत मतदार नोंदणी करू शकत असल्याचे सांगण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोग आणि शिक्षण विभाग यांच्यात दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य कराराची सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत घरोघरी भेटी दिल्या, यात विद्यार्थ्यांचाही सहभाग मोठा होता. या लोकसभा निवडणुकीवेळी राज्यातील सर्व जिल्ह्यात यासारखे घरोघरी भेटी, पथनाट्यांद्वारे जनजागृती, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी फिरत्या व्हॅनद्वारे जनजागृती  करावी, यासाठी महाविद्यालयांना जिल्हाधिकारी आणि वर्शीप अर्थ फाऊंडेशनची मदत होईल.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी निवडणुकीत काय कामे करावी याबद्दल मार्गदर्शन करीत प्राचार्यांच्या प्रश्नांचे निरसन करत संवाद साधला. नोडल अधिकाऱ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण सूचनांची दाखल घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

https://www.youtube.com/watch?v=9uFZI7ujChc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.