Lonavala News  : लोणावळा शहरात निर्बंधमुक्त वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

एमपीसी न्यूज – ढोल ताश्यांचा कडकडाट, गुलाल फुलांची मुक्त उधळण व निर्बंधमुक्त वातावरणात लोणावळा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक रात्री दिड वाजता पार पडली.अतिशय आनंदमय वातावरणात, जल्लोषात लोणावळ्यातील मानाच्या बाप्पांची साडेसात तास मिरवणूक सुरु होती.

सायंकाळी सहा वाजता मानाचा पहिला रायवुड गणेश उत्सव मंडळाचा बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला मावळा पुतळा चौकात सुरुवात झाली.त्या मागोमाग मानाचा दुसरा तरुण मराठा मित्र मंडळ, गावठाण, मानाचा तिसरा गणपती रोहिदाद तरुण मंडळ, रोहिदासवाडा, मानाचा चौथा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गवळीवाडा, मानाचा पाचवा गणपती असलेला शेतकरी भजनी मंडळ, वलवण, मानाचा सहावा राणाप्रताप नेताजी मित्र मंडळ, तदनंतर गजानन मित्र मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट, ओमकार तरुण मंडळ यांच्यासह मानाचे गणपत रांगेत उभे होते. प्रत्येक बाप्पांच्या समोर ढोल ताश्या पथकांनी उत्तम सादरीकरण करत पारंपारिक खेळ सादर केले. साडेसात तास ही विसर्जन मिरवणूक सुरु होती.

लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा गणराया अँवाॅर्ड समिती, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, सत्यनारायण कमिटी यांनी स्वागतकक्ष लावत सर्व गणपती पथके व ढोलताशा पथके यांचा सन्मान व स्वागत केले.शिवसेनेच्यावतीने भाविकांसाठी महामंडळांचे आयोजन केले होते.सत्यानंद तिर्थधाम आश्रम भांगरवाडी यांच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.

रामदेव बाबा भक्त मंडळाच्यावतीने भेळ तर लायन्स क्लबच्यावतीने चहा वाटप करण्यात आला. विसर्जन मिरवणूक व घाटावर लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.