Entertainment News: बाहुबली प्रभासने केले ‘हंबीरराव’ आणि प्रवीणचे कौतुक

एमपीसी न्यूज : संदीप मोहिते पाटील यांची प्रस्तुती असलेल्या आणि उर्वीता प्रोडक्शन्सतर्फे शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोरा यांनी निर्मित केलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट “सरसेनापती हंबीरराव”चा टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आता यात भर पडली आहे टॉलिवूड आणि बॉलीवूडमधल्या “सुपरस्टार्स”ची आणि त्यांनीसुद्धा हा टीजर पाहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

डार्लिंग स्टार म्हणून ओळख असणाऱ्या आणि बाहुबली चित्रपटाद्वारे जगभर आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुपरस्टार प्रभासने “सरसेनापती हंबीरराव” चित्रपटाचा टीजर पाहिला आणि सोशल मिडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे. “मला टीजर खूप आवडला! मराठीतील आत्तापर्यंतच्या सर्वात भव्य अशा ऐतिहासिक चित्रपटाला माझ्या खूप शुभेच्छा.

#SarsenapatiHambirrao Pravin Vitthal Tarde”

https://www.facebook.com/story.php?story_fbid=481903036626228&id=100044196081040

लॉकडाऊन नंतर पुन्हा थिएटर उघडल्यामुळे प्रेक्षकांना उत्तमोत्तम चित्रपटांची पर्वणी मिळत आहे. टीजर पहाता पुन्हा एकदा प्रवीण तरडे बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे यात काही शंका नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.