Ulhas Bapat : 38 आमदारांनी पाठिंबा काढला तरी फ्लोअर टेस्ट द्यावीच लागेल, घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात…

एमपीसी न्यूज – राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यात आज नवीन अंक पाहायला मिळाला. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. मात्र बंडखोर 38 आमदारांनी जरी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला तरीही या सर्व आमदारांना फ्लोर टेस्ट द्यावीच लागणार आहे, असे घटना तज्ञ प्राध्यापक उल्हास बापट  (Ulhas Bapat)  यांनी सांगितले. 

उल्हास बापट म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो. देशाचे राष्ट्रपतीसुद्धा 143 कलमाखाली सुप्रीम कोर्टाचे मत घेऊ शकतात. जरी या बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला असला तरीही त्यांना सभागृहात जावेच लागेल. महाराष्ट्रात जोपर्यंत सरकार अस्तित्वात आहे तोवर सभागृहात पाठिंबा काढला जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

 

Pimpri Corona Update: शहरात आज 76 नवीन रुग्णांची नोंद, 55 जणांना डिस्चार्ज

 

बापट म्हणाले,  सभाग्रहात जे घडते  (Ulhas Bapat)  त्यात कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही. मात्र घटनेचे उल्लंघन झाल्यास त्या प्रमाणे कोर्टात दाद मागता येते. पक्षाचे चिन्ह आणि इतर गोष्टी निवडणूक आयोगाच्या कक्षेत येते. त्याचा कोर्टाशी संबंध नाही. मात्र निलंबन करायचे असल्यास याचा निर्णय कोर्ट घेते. कायद्यानुसार शिवसेनेने नेमलेला प्रतोद आणि गटनेता योग्य आहे. शिंदे गट अधिकृत नाही त्यामुळे त्यांची नेमणूक अधिकृत होऊ शकत नाही, अशी ही माहिती उल्हास बापट यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.