Pune News : आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने छंद जोपासावेत – मनोहर पारळकर

एमपीसी न्यूज – ‘आयुष्य जगताना अनेकदा आपण आपल्या आवडी-निवडी छंद जोपासण्याकडे दुर्लक्ष करतो. मग निवृत्तीनंतर काय करायचे, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यातून आपले जीवन उदासीन होते. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले छंद जोपासावेत, असे मत टाटा मोटर्सच्या मनुष्यबळ विभागाचे निवृत्त वरिष्ठ महासंचालक मनोहर पारळकर यांनी व्यक्त केले.

पंडित वसंतराव देशपांडे यांच्या कन्या आशा वडूजकर लिखित ‘माझं ऑस्ट्रेलिया भ्रमण’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. पुणे येथील आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रकाशन सोहळ्यासाठी लेखिका आशा वडूजकर, वल्लरी प्रकाशनचे संचालक व्यंकटेश कल्याणकर, लेखक प्रकाश तांबे आदी उपस्थित होते.

लेखिका आशा वडूजकर म्हणाल्या, “2000 मध्ये मी माझ्या मुलीसोबत ऑस्ट्रेलियाला गेले. मुलीच्या आग्रहास्तव मी तेथील कम्युनिटी क्लबमध्ये प्रवेश घेतला. इंग्रजी फारसे येत नसतानाही तेथील मैत्रिणींनी मला अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये समाविष्ट करून घेतले. पुढे त्यांच्यासोबत बरेच ठिकाणी फिरणे झाले आणि ऑस्ट्रेलिया देशाचे अनेक पैलू उलगडले.”

प्रास्ताविक प्रकाश तांबे यांनी केले. सूत्रसंचालन गीता पत्की यांनी केले. बापू देशपांडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.