Lucknow News : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

एमपीसी न्यूज :  प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित 83 वर्षीय बिरजू महाराज यांनी काल मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला.

महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. पंडित बिरजू महाराज यांचं उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

पंडित बिरजू महाराज यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. ते लखनऊ घराण्यातील होते. पंडित बिरजू महाराज हे कथ्थक नर्तक तसेच शास्त्रीय गायक होते. पंडित बिरजू महाराज यांचे वडील आणि काका देखील कथ्थक नर्तक होते.

भारतातील महान कलाकारांमध्ये पंडित बिरजू महाराजांचं नाव समाविष्ट आहे. जगभरात त्यांचे लाखो आणि करोडो चाहते आहेत. गायिका मालिनी अवस्थी आणि अदनान सामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.