Hinjawadi News : अपहार प्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विश्वासाने दिलेले टाइल्सचे साहित्य आणि दुचाकीचा अपहार करत कामगाराने पंधराशे टाइल्सचे तोडून फोडून नुकसान केले. ही घटना 15 जानेवारी ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत कोलते-पाटील इंटिग्रेटेड टाउनशिप यांच्या लाइफ रिपब्लिक मरुंजी या बांधकाम साईटवर घडली. या प्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणू पिल्लूराम कुशवा (रा. तिलोंजी, केलारस, जि. मोरेना मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी टाइल्स कॉन्ट्रॅक्टर अमोल मनोहरराव गुल्हाने (वय 42, रा. बालेवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काऊंटडाऊन दहावी! भाग 9 – दहावीत टक्केवारी वाढविण्यासाठी संस्कृतचा अभ्यास महत्त्वाचा – सुवर्णा बोरकर. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुशवा हा फिर्यादी यांच्याकडे काम करतो. फिर्यादी यांनी आरोपीकडे कोलते-पाटील इंटिग्रेटेड टाउनशिप यांच्या लाइफ रिपब्लिक मारुंजी या साइटवर 19 हजार रुपयांचे टाइल्सचे साहित्य आणि त्याला वापरण्यासाठी एक दुचाकी दिली होती. या सर्व वस्तूंचा आरोपीने अपहार केला. तसेच लाइफ रिपब्लिक या बांधकाम साइटवरील बाथरूम, किचन, ड्राय बाल्कनी येथे बसवलेल्या सुमारे पंधराशे टाइल्सचे तोडून पडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.