Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात काटे की टक्कर!

एमपीसी न्यूज :  उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात सुरुवातीच्या निकालात भाजपा १५० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्ष  यूपीत ७७ जागांवर आघाडीवर आहे. गोवा राज्यातही काँग्रेस-भाजपा यांच्यात जोरदार मुकाबला सुरू आहे.

गोव्यातील विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत.

यात भाजपाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. गोव्यात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली असून १६ जागांवर आघाडी प्राप्त केली आहे. तर भाजप १८ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्ष ३ जागांवर आघाडीवर असून सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये ‘काँटे की टक्कर’ असून भाजपाची सत्ता आता पणाला लागली आहे. काँग्रेसला सध्या मिळालेली आघाडी पाहता भाजपला गोव्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.