Pimpri News : अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, महाराष्ट्र सुरक्षा बोरच्या जवानांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील शगुन चौक येथे अतिक्रमण कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक गेले असता कारवाई करत असताना तिघांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि. 9) दुपारी बारा वाजताच्या सुमारास शगुन चौक पिंपरी येथे घडली.

विनोदकुमार आशुदमन चंदानी (वय 48), आशिष विनोद कुमार चंदानी (वय 21), विजय पुरुषोत्तम बलवानी (वय 21, सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमित चंद्रकांत पवार (वय 31) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण पथकात काम करतात. ते बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास शगुन चौक पिंपरी येथील मेनकापड बाजार येथे अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेले होते. शगुन चौकातील पर्ल कलेक्शन या कपड्याच्या दुकानासमोर कपडे विकण्यासाठी ठेवले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यावर कायदेशीर कारवाई केली.

काऊंटडाऊन दहावी! भाग 9 – दहावीत टक्केवारी वाढविण्यासाठी संस्कृतचा अभ्यास महत्त्वाचा – सुवर्णा बोरकर. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखले. आरोपी फिर्यादी यांच्या अंगावर धावून आले. तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना आरोपींनी धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी आशिष आणि विजय यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.