Alandi Rural Hospitals : अखेर नगरपरिषदेने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वाहने आणि फेरीवाल्यांना केली बंदी

एमपीसी न्यूज : आळंदीमधील (Alandi Rural Hospitals) पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य फाटकपर्यंत रस्त्यावर भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले बसल्यास तसेच सदर ठिकाणी कोणी वाहने लावल्यास कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल याची सक्त नोंद घ्यावी, असे आळंदी नगरपरिषदेच्या आदेशाचे फलक पोलीस चौकी ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत लावण्यात आले आहेत.

या रस्त्यावरुन ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेतून रुग्ण नेत असताना किंवा आणत असताना रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते, इतर विक्रेत्यांमुळे व तेथे लावण्यात आलेल्या वाहनांमुळे हा रस्ता अरुंद झाल्याचे दिसून येत असे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या प्रवासात अडचण निर्माण होत होती. यासोबतच लोकांची वर्दळ, गोंधळ आणि बाजार असल्याने निर्माण होणारा आवाज यामुळे रुग्णांना (Alandi Rural Hospitals) त्रास सहन करावा लागत होता.

Chandrakant Patil : बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिवांच्या मानधनात वाढ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.