Pune Crime News : जुगारात हरलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण, जबरदस्ती काढून घेतला ऐवज 

एमपीसी न्यूज – जुगारात हरलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी पाच जणांनी एका पस्तीस वर्षीय व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर जबरदस्तीने त्याच्याजवळील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल आणि गुगल पे वरून पैसे ट्रान्सफर करून घेतले, तसेच त्याला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. पुण्याच्या कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभय जोगदंड, अभी बाळशंकर आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र संगय्या हिरेमठ यांनी फिर्याद दिली आहे. 10 सप्टेंबर व 18 व 19 ऑक्टोबर रोजी हा प्रकार बिबवेवाडी-कोंढवा परिसरात घडला.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी हे मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यामध्ये तीन लाख 96 हजार रुपये हरले होते. आरोपींनी 18 ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या पत्नीला फोन करून फिर्यादीचा मोबाईल व पर्वतीतील जनता वसाहत येथे लावलेल्या भिशीच्या संबंधाने करायच्या केसची कागदपत्रे घेतली. त्यानंतर फिर्यादी यांचे अपहरण करून त्यांना गाडीत बेदम मारहाण केली, हात-पाय तोडण्याची धमकी देखील दिली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.