Pune News : पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : पुण्यातील विमानतळ परिसरातून एका घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय. घरा शेजारीच राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाने 5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले.

पीडित चिमुरडीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून आरोपी नराधमाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी त्याला अटकही केलीय. शनिवारी सकाळी हा प्रकार घडलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शनिवारी सकाळी घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिला घराबाहेर बोलावले. त्यानंतर एका इमारतीच्या कार पार्कींगमध्ये घेऊन जात कारच्या आडोशाला तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान घरी गेल्यानंतर चिमुरडीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.