Pune Crime News : बॉडी फुगवणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारे जेरबंद

एमपीसी न्यूज – बॉडी वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या संमतीने विक्री करणे बंधनकारक असलेले मेफनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीररित्या जवळ बाळगून त्याची विक्री करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल 211 इंजेक्शन आणि सरकार असा दोन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिबेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.

परेश निवृत्ती रेणुसे (वय 33), प्रवीणसिंग पुकसिंग भाटी (वय 23), अक्षय संभाजी वांजळे (वय 26) आणि शौनक प्रकाश संकपाळ (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळोखे पेट्रोलिंग करत असताना त्यांना आरोपी विषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बिबवेवाडीतील डॉल्फिन चौकात सापळा रचला आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय शरीरयष्टी वाढविण्यासाठी लागणाऱ्या औषधांची विक्री करण्यासाठी आलेल्या परेश रेणुसेला सापळा रचून अटक केली.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून इंजेक्शनच्या सहा बॉटल हस्तगत केले. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत इतर साथीदारांची नावे उघड झाली. त्यानंतर त्यांच्या घरी झडती टिकू 211 बॉटल्स व एक कार मिळाली. अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सतीश सरकाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.