Talegaon Dabhade : चाकूने वार करत तळेगावातील इंद्रायणी महाविद्यालयासमोरच टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज : कॉलेजमध्ये झालेल्या वादातून आठ मुलांनी एकावर चाकूने वार करून जखमी केले.(Talegaon Dabhade)ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी इंद्रायणी कॉलेज समोर घडली.

याप्रकरणी 17 वर्षीय जखमी मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अल्पवयीन मुले आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : मृत जनावरांची उघड्यावर विल्हेवाट; परिसरात दुर्गंधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॉलेज मध्ये असताना दुपारच्या सुट्टीत त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. त्या कारणावरून आरोपी मुलांनी कॉलेजच्या समोर असलेल्या एका दुकानात फिर्यादीस हाताने,(Talegaon Dabhade)  लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच चाकूने फिर्यादीच्या पाठीत वार करून शिवीगाळ दमदाटी केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.