Pune : झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘घंटानाद’ आंदोलन करणार – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज – अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा होत नाही. ओढ्यानाल्याला आलेल्या पुरामधील पूरग्रस्तांना मदत नाही. धरण क्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना 2 वेळ पाणी मिळत नाही. शहरात अघोषित पाणीपुरवठा करण्याचे धोरण आहे. महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना याचे काहीही गांभीर्य नाही. यांना जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लवकरच ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी दिला.

यावेळी नगरसेविका नंदा लोणकर उपस्थित होत्या.

पुणेकरांना 24 तास पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन भाजपतर्फे देण्यात आले होते. पण, सध्या शहरात अघोषित पाणीकपात सुरू आहे. महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांना काहीही गांभीर्य नाही. एक तास पाऊस झाला तर शहरात वाहतूक कोंडी होते. विधानसभा निवडणूक झाली असून सत्ताधाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 3 वर्षांत एकही प्रकल्प भाजपने पूर्ण केला नाही. उर्वरित 2 वर्षांत काय करणार? असा सवालही बराटे यांनी उपस्थित केला.

भामा – आसखेड प्रकल्प पूर्ण न झाल्यानेच भाजप आमदाराचा पराभव झाला. तर, गुरुवारी पाऊस बंद असला तर तीन दिवस पाणी येत नसल्याचे नगरसेविका नंदा लोणकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.