Pune News : ई-वाहनधारकांसाठी गुड न्यूज! या महामार्गांवर मिळेल ‘फास्ट चार्जर’ची सुविधा

एमपीसी न्यूज : पुणे-मुंबई महामार्ग वगळता शहरातून जाणाऱ्या अन्य सर्व महामार्गांवर आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. (Pune News) त्यामुळे चार्जिंगअभावी लांबचा प्रवास टाळणाऱ्या ई-वाहनधारकांना आता बिनधास्तपणे जाणे शक्य होणार आहे. भारत पेट्रोलियमकडून पुण्याहून नगर-औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, कोल्हापूरला जाणाऱ्या महामार्गांसह मुंबई-नाशिक आणि नाशिक-शिर्डी या महामार्गांवर 24 ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

 

भारत पेट्रोलियम’ने एकूण सहा महामार्गांचे इलेक्ट्रिक कॉरिडॉरमध्ये रुपांतर केले आहे. या महामार्गांवरील पेट्रोल पंपांवर ई-वाहनांसाठी ‘फास्ट चार्जर’ उपलब्ध करून देण्यात येणार असून, (Pune News) त्याद्वारे केवळ 30 मिनिटांत वाहनाची बॅटरी चार्ज होणार आहे. प्रत्येक महामार्गावर कमाल 100 किलोमीटर अंतरावर दोन चार्जिंग स्टेशन असणार आहेत. लवकरच याचे उद्गाटन करण्यात येणार आहे.

 

Pune News : त्या तरुणाचा मृत्यू विजेच्या धक्याने  नाही – महावितरण 

शहरी भागात ई-दुचाकींचे प्रमाण अधिक आहे.(Pune News) त्यामुळे शहरातील पेट्रोलपंपांवर प्रामुख्याने दुचाकी वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याची सुरुवात मुंबईमध्ये करण्यात आली असून, अन्य शहरांत लवकरच विस्तार केला जाणार आहे.

चार महामार्गांवरील स्टेशन

पुणे-नाशिक महामार्ग : चिंबळी, भोरवाडी, रायतेवाडी, संगमनेर, गोंदे, सिन्नर

पुणे-कोल्हापूर महामार्ग : उडतरे, नागेवाडी, मालखेड.

पुणे-सोलापूर महामार्ग : कुरकुंभ, वरकुटे, मोहोळ, मुळेगाव.

पुणे-नगर-औरंगाबाद महामार्ग : लोणीकंद, कोंढापुरी, सुपा, चास, घोडेगाव, कंगोनी, वाळूंज.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.