Chikhali News : गुटखा विक्री करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्या प्रकरणी एका व्यक्तीला चिखली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 37 हजार 300 रुपयांचा (Chikhali News) गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 14) सायंकाळी कुदळवाडी येथे करण्यात आली.

अब्दुलमजीद मुबारक अली कपूर (वय 34, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी  शिपाई गणेश खेडकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; 72 प्रवाशांसह विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कपूर याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला विक्री करण्यासाठी त्याच्या घरात साठवून ठेवला. (Chikhali News) याबाबत चिखली पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 2 लाख 37 हजार 300 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.