Handa Morcha : पाणीबाणी विरोधात आपचा पालिकेवर हंडा मोर्चा

एमपीसी न्यूज : पाणीटंचाई (Handa Morcha) कृत्रिमरीत्या वाढवून तिचे रूपांतर पाणीबाणीमध्ये केलेले आहे. महापालिका प्रशासनाला पाणीचोरीला पायबंद घालण्यात अपयश आले आहे. टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवकांचे आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे. या विरोधात आज सोमवारी आम आदमी पक्षातर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला.
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहेच. त्याशिवाय पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील परिघावरील भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. याबाबत वारंवार पुणे महानगरपालिकेला निवेदने देऊनसुद्धा परिस्थितीमध्ये कोणताच फरक न पडल्याने हंडा मोर्चाचे काढला, असे आम आदमी पक्षाचे पुणे शहर जल हक्क आंदोलन समितीचे आबासाहेब कांबळे यांनी सांगितले.
अनेक भागांत पालिकेचे पाणी पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे नाईलाजास्तव शेकडो सोसायट्यांना दरमहा लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करून पाणी विकत घ्यावं लागतं. पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना टँकरचे पैसे सुद्धा द्यावे लागतात, हा दुहेरी कर नागरिकांवर अन्यायकारक आहे, असे जल हक्क आंदोलन समितीचे (Handa Morcha) सुदर्शन जगदाळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे, अमोल काळे, निलेश वांजळे, विद्यानंद नायक, अन्वर बाबा शेख, उमेश बागडे, फेबियन अण्णा सॅमसन, यशवंत बनसोडे, आरती करंजावणे, ज्योती ताकवले, सुनंदा जाधव, वैशाली डोंगरे, सीमा गुट्टे, सचिन कोतवाल, विद्यानंद नायक शहर संघटक एकनाथ ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ. अभिजीत मोरे, आबासाहेब कांबळे, विद्यानंद नायक, सीमा गुट्टे, ज्योती ताकवले यांच्या शिष्ट मंडळाने आयुक्त विक्रम कुमार आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी चर्चा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.