Pimpri News : हातगाडी, स्टॉलधारकांनो प्लास्टिक कॅरीबॅग बंद करा; फेरीवाला दिनानिमित्त आवाहन

आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिनानिमित्त कापडी पिशव्या वाटून पर्यावरण रक्षणाचा फेरीवाल्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज – नॅशनल हॉकर्स फेडरेशन,महाराष्ट्र हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिवस फेरीवाला कायद्याची आमंलबजावणीची मागणी करत आनंदात साजरा करण्यात आला. पर्यावरण आणि आरोग्य रक्षणासाठी शहरातील 15 ठिकाणी प्लास्टिक वापरणार नाही, ग्राहकांना येताना कापडी पिशव्या घेऊन येण्याचे आवाहन करत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आल्याचे काशिनाथ नखाते यांनी सांगितले.

इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर,राजेश माने,ओमप्रकाश मोरया,सागर बोराडे,फरीद शेख,राम शेलार,तुकाराम गाडेकर,पुष्पेन्द्र कुशवाह,अंबालाल सुखवाल सागर बोराडे,समाधान मुसळे,फरीद शेख,अरुण मेहेर, देवीलाल आहीर ,जय कुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सकारात्मक पाऊल घेत प्लास्टिक पिशव्या बंदी केली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य अधिकारी डॉ अनिल रॉय यांच्या उपस्थितीत बैठक झाली. याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे स्वागत करण्यात आलेले असून आरोग्य रक्षण व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महासंघ महापालिकेच्या या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी राहील. त्याचबरोबर शहरातील पथ विक्रेत्यानी प्लास्टिकच्या बंद करुन कागदी बॅग,वृत्तपत्रांच्या पिशव्या आणि कापडी पिशव्या वापराला अधिक चालना द्यावी अशी मत नखाते यांनी व्यक्त केले .

इरफान चौधरी म्हणाले की, आम्ही ग्राहकांना गेल्या दोन-तीन वर्षापासून सांगत आहोत की फळ असेल भाजीपाला असेल खरेदी करायला येताना कापडी पिशव्या घेऊन या त्यामुळे ग्राहकांमध्ये बर्‍यापैकी जनजागृती झाली असून बराच बदल होत आहे .

अनिल बारवकर म्हणाले की संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियानाच्या अंतर्गत फेरीवाल्या मध्ये जनजागृती करून पर्यावरण रक्षणासाठी अनेक वेळा आम्ही कार्यशाळा घेतल्या शासन व संघटना मिळून त्यांना प्रमाणपत्र ही वाटप केले त्यामुळे अनेक ठिकाणी परिणाम झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.