Pune News : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हनुमंत नाझीरकरला लाचलुचपतने केली अटक

एमपीसी न्यूज : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझिरकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी दोन वर्षांनी अटक केली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वर्षांपूर्वी अलंकार पोलिस ठाण्यात नाझरीकर विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बारामती पोलिसांनी नाझिरकर याला अटक केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी त्याला ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातून घेतले.

नाझीरकर हा अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यानंतर बारामती पोलिसांनी त्याला दहा दिवसांपूर्वी महाबळेश्वर येथे पकडले होते. फळ विक्रेत्यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्याला अटक केली. त्यानंतर गेले आठ दिवस नाझीरकर हा पोलीस कोठडीत होता.

दरम्यान नाझीरकर याला ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत विभागाने मंगळवारी रात्री त्याला पुण्यात आणले. नाझीरकर याच्याविरोधात उत्पन्नापेक्षा कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती. त्यामुळे पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात नाझीरकर याच्यासह पत्नी मुलगा आणि मुलगी त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.