Pimpri News: पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला;  24 तासात 65 मिली मीटर पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरात  पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 65 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 2.5 टक्यांनी वाढ झाली आहे.  धरणातील एकूण पाणीसाठा 37.85 टक्के झाला आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. पवना धरण परिसरात पावसाने चांगलीच दडी मारली होती. पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त केली जात होती. विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे.

पवना धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 65मि.मि.

# 1 जूनपासून झालेला पाऊस = 738मि.मि.*

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =     465
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = 37.85% टक्के*

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = *       34.62% टक्के*

# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 2.05% टक्के*

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 7.26% टक्के*

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.