Hinjawadi : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा (Hinjawadi)मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी पावणे नऊ वाजता विप्रो सर्कल, फेज एक, हिंजवडी येथे घडली.

दिनकर बबन सुतार (वय 41, रा. मुळशी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव (Hinjawadi)आहे. याप्रकरणी दिनकर यांचे बंधू भाऊ बबन सुतार (वय 50) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/एचयु 60006) चालक बाळासाहेब बलभीम बावटे (वय 34, रा. माण, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

TRAI DND App : अनावश्यक कॉल आणि मेसेजची करता येणार थेट तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ दिनकर हे त्यांच्या दुचाकीवरून कंपनीत कामावर जात होते. ते विप्रो सर्कल येथे आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या एका डंपरने धडक दिली. त्यामध्ये दिनकर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.