Hinjawadi : किचनच्या खिडकीची जाळी कापून पाऊण लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज- फ्लॅटच्या किचनची जाळी कापून चोरटयांनी घरातील पाऊण लाखांचा ऐवज लंपास केला. १९ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान हिंजवडीतील मेगापोलीस सोसायटीमध्ये ही घटना घडली.

या प्रकरणी अनुष्का नरेंद्र जेठी (वय २२,रा.हिंजवडी, मुळगाव उत्तरप्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेठी यांचा फ्लॅट १९ एप्रिल ते २६ एप्रिल २०१९ दरम्यान बंद होता. दरम्यान अज्ञात चोरटयांनी फ्लॅटच्या किचनच्या खिडकीची जाळी कापून घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेला लॅपटॉप, दोन मोबाईल फोन व सोन्याचे दागिने असा ८६ हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला. मंगळवारी सकाळी जेठी या घरी आल्या असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. उपनिरीक्षक एम.डी.वरुडे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.