Selling Tobacco Products : तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील कस्तुरी चौकात हिंजवडी पोलिसांनी (Selling Tobacco Products) तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 14 हजार 760 रुपये किंमतीचा प्रतिबंधित माल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 19 मे) रात्री पावणे दहा वाजता करण्यात आली.

अर्जुन नारायण मंडल (वय 24, रा. हिंजवडी), वैभव प्रल्हाद वारडे (वय 35, रा. आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अमित जगताप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hinjawadi : ‘गाडी हळू चालव’ म्हटल्याने एकास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली कि, कस्तुरी चौक हिंजवडी येथील ठेका हॉटेल येथे दोघेजण तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी ठेका हॉटेलवर गुरुवारी रात्री छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी हॉटेल चालक – मालक वैभव आणि हुक्का बनवणारा अर्जुन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 हजार 760 रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना (Selling Tobacco Products) सीआरपीसी 41 (1) (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.