Wakad Prostitution Case : वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हे शाखेचा छापा; दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर (Wakad Prostitution Case) गुन्हे शाखा युनिट चारने छापा मारून कारवाई केली. त्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 19 मे) रात्री भूमकर चौक येथील हॉटेल के इन येथे करण्यात आली.

पायल, हिरा, हॅप्पी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Selling Tobacco Products : तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. हा प्रकार गुन्हे शाखा युनिट चारला समजला असता पोलिसांनी गुरुवारी रात्री पावणे बारा ते शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या कालावधीत हॉटेल के इनवर छापा मारला. यात पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून आरोपींकडून 82 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वाकड पोलीस तपास (Wakad Prostitution Case) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.