Hinjawadi Crime News : अंमली पदार्थ बाळगणारे सहाजण जेरबंद, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त 

एमपीसी न्यूज – गांजा, चरस यासारख्या अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणा-या सहाजणांना जेरबंद करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि.08)ही  कारवाई केली. या आरोपींकडून  सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

प्रशांत अनिल माळी (वय 30, रा. जाधववस्ती, बावधन), ओमकार राजेंद्र नगरकर (वय 22, रा. रविवार पेठ, पुणे), तेजस पुनमचंद डांगी (वय 26, रा. बावधन), सुजित गोरख दगडे (वय 23, रा. बावधन), राहुल कवडे (रा. भुंडेचाळ, जाधववस्ती, बावधन) व समीर शेख (रा. भुंडेचाळ, जाधववस्ती, बावधन), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत माळी व ओमकार नगरकर यांची एमएच 12 एन एन 1173 या दुचाकीच्या डिकीतून 298 ग्रॅम गांजा व 9 ग्रॅम चरस, तसेच आरोपी तेजस डांगी व सुजित दगडे यांच्याजवळ 12 किलो 434 ग्रॅम गांजा आणि आरोपी राहुल कवडे व समीर शेख यांच्या खोलीवर 1 किलो 428 ग्रॅम गांजा व 9 ग्रॅम चरस मिळाले. त्यांच्या जवळून 4 लाख 29 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.