Hinjawadi : ऑफिसचा दरवाजा तोडून लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – ऑफिसच्या दरवाजाचे लॉक तोडून ऑफिसमध्ये ठेवलेला लॅपटॉप चोरून नेला. ही घटना हिंजवडी फेज तीन येथे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

राधविद्र प्रभू सिंह (वय 44, रा. डीनीया हाऊसिंग सोसायटी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधविद्र हिंजवडी फेज तीन येथे एका कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांचे ऑफिस सोमवारी बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लॉक तोडून ऑफिसमध्ये प्रवेश केला. ऑफिसमध्ये ठेवलेला डेल कंपनीचा 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.