Hinjawadi : गावठी दारू बनवण्याचे रसायन हिंजवडी पोलिसांनी केले जप्त

एमपीसी न्यूज : गावठी दारू (Hinjawadi) बनवण्याचे 2.04 लाख रुपये किंमतीचे रसायन हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहे.

Toll News: बंद टोलनाक्यांचे सांगाडे हटवा, अन्यथा जाहीर लिलाव करू

यातील आरोपी नटवर उर्फ नटरु मारवाडी (रा. जांबे गाव) हा पळून गेला आहे. आरोपी जांबे गावामध्ये 4 जुलै रोजी 2,04,700 रुपये किंमतीचे गावठी हातभट्टीचे रसायन एका लोखंडी मोठ्या गोल पिंपात ढवळून त्यापासून दारू काढत असताना मुद्देमालासह सापडला. पण, पोलिसांची चाहूल लागताच तो आजूबाजूच्या झाडीचा (Hinjawadi) फायदा घेऊन पळून गेला. आरोपी विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात मुंबई प्रतिबंध ऍक्ट कलम 65(ब ), (फ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.