YCMH News : शस्त्रक्रियेसाठी 22 प्रकारच्या इम्प्लांट साहित्याची खरेदी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (YCMH News) वायसीएम रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रूग्ण आणि इतर रूणांकरिता शस्त्रक्रिया किंवा इतर उपचाराकरिता लागणारे 22 प्रकारचे इम्प्लांट साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. तीन पुरवठादारांकडून हे साहित्य खरेदी करण्यासाठी 1 कोटी 24 लाख रूपये खर्च होणार आहे.

वायसीएम रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रूग्ण आणि इतर रूग्णांकरिता शस्त्रक्रिया किंवा इतर उपचाराकरिता लागणारे इम्प्लांट साहित्य दर करार पद्धतीने खरेदी करण्यात येते. हे इम्प्लांट साहित्य खरेदी करण्यासाठी इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या.

Chikhali News: घरकुलमधील मतदारांची फेर नोंदणी करण्याची मागणी

त्यानुसार, इशेलॉन मेडीकल सर्व्हीसेस (YCMH News) यांनी एकूण 14 बाबींसाठी 12 लाख 15 हजार रूपये, नेबूला सर्जिकल प्रायव्हेट लिमिटेड यांनी दोन बाबींसाठी 72 हजार 450 रूपये आणि ए प्रामा एंटरप्रायजेस यांनी सहा बाबींसाठी 1 लाख 12 हजार रूपये असे एकूण 1 कोटी 24 लाख रूपये दर सादर केले. हे दर अंदाजपत्रकीय 1 कोटी 67 लाख रूपयांपेक्षा 25.36 टक्क्यांनी कमी आहेत. हे प्राप्त लघुत्तम दर स्वीकृत करण्यात आले आहेत. त्यानुसार, या तीन पुरवठादारांकडून 22 प्रकारचे इम्प्लांट साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.