Hinjwadi News : इंटेरियरचे कोटेशन देण्यासाठी घरी आलेल्या तरुणीसोबत गैरवर्तन

एमपीसी न्यूज – घराच्या इंटेरियरचे (Hinjwadi News) कोटेशन देण्यासाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी करत गैरवर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न करण्याचा हा प्रकार 15 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बावधन येथे घडला.   

याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याज दिली. त्यानुसार अक्षय मल्हारी येणपुरे (वय 27, रा. सिल्व्हर मनु सोसायटी, बावधन, पुणे) याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

फिर्यादी तरुणी आणि जय मेने हे दोघे इंटेरिअर डिझाइनिंगचे कोटेशन देण्यासाठी आरोपीच्या घरी गेले होते. फिर्यादीचा सहकारी जय याला फोन आल्याने तो बाहेर गेला होता. त्यावेळी आरोपी अक्षय याने फिर्यादी तरुणीला चहा करण्यास सांगितले. फिर्यादी चहा करत असताना आरोपीने गैरवर्तन केले. फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण केली. त्यानंतर फिर्यादीकडे वारंवार लग्न करण्याची आणि फिरायला जाण्याची मागणी केली.

Molestation of woman : पती नसताना घरात घुसून महिलेचा विनयभंग

तसेच 23 मे रोजी सायंकाळी (Hinjwadi News) साडेसातच्या सुमारास डॉक्युमेंट अॅग्रीमेंटवर सही करण्यासाठी कोथरूड येथे बोलावून घेतले. आरोपीने त्यावेळी पुन्हा लग्नाची मागणी करून फिर्यादी सोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.