Phule Wada : फुलेवाड्याच्या कमानीवर स्वतःच्या कुटुंबीयांची नावे टाकण्याचा प्रकार लांच्छनास्पद – विजय कुंभार

एमपीसी न्यूज : महात्मा फुले वाड्याच्या (Phule Wada) मुख्य कमानीवर माजी नगरसेविकेच्या सासूचे नाव आणि संकल्पना म्हणून माजी महापौर, माजी नगरसेवकांची नावे टाकण्याचा प्रकार हा लांच्छनास्पद आहे. हा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान आहे. नगरसेवकांनी सर्व लाज सोडली असून ते स्वतःला शहराचे मालक समजत आहेत. या धेंडांना येत्या निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केले आहे. 

याबाबत आम आदमी पक्षाचे शहर संघटक एकनाथ ढोले यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला. तातडीने मनपाकडे तक्रार करुन हे बोर्ड हटवण्यास भाग पाडले. भाजपने समस्त पुणेकरांची आणि महात्मा फुले प्रेमींची माफी मागावी, अशी मागणी एकनाथ ढोले यांनी केली.

 

Phule Wada 1

 

पुणे शहरामध्ये लाखो ठिकाणी चौक, ऐतिहासिक स्थळे, रस्ते, पूल, बगीचे, क्रीडांगणे, उड्डाणपूल, लायब्ररी, बस स्टॉप, फायर ब्रिगेड, स्मशानभूमी, मंदिरे, इतकच काय तर खाजगी इमारतीतील बाहेर देखील नगरसेवकांनी संकल्पना आणि सौजन्याचे बोर्ड लावलेले आहेत.

Modi Sarkar : मोदी सरकारची आठ वर्षे पुण्याच्या पदरी शून्यच – मोहन जोशी

 

आम आदमी पक्ष याचा तीव्र निषेध (Phule Wada) व्यक्त करीत असून ही जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी आहे आणि सार्वजनिक हिताच्या गोष्टींमध्ये स्वतःची किंवा स्वतःच्या कुटुंबियांची अशा पद्धतीने नावे लावणे चुकीचे आहे, असे आम आदमी पक्षाचे मत असून मनपाने तातडीने हे सर्व संकल्पना, सौजन्याचे बोर्ड हटवावेत आणि पालिकेने ते हटवण्याचा खर्च हा संबंधित नगरसेवकांकडून वसूल केला जावा… तो खर्च देण्यास नकार दिल्यास तो निवडणूक खर्चामध्ये पकडला जावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.