Molestation of woman : पती नसताना घरात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – घरात घुसून गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग (Molestation of woman) केल्याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.26 मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास रिव्हर रोड, पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेश गोपालदास रोहरा (वय 35, रा. उल्हासनगर) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे.

Pimpri News : ‘सोळावं वरीस मोक्याचं’, 15 ते 21 वयोगटातील युवांसाठी 5 जून रोजी विशेष मार्गदर्शनपर शिबिर

आरोपी राजेश हा (Molestation of woman) फिर्यादी यांच्या घरी 7 ते 8 वर्षांपूर्वी भाड्याने राहण्यास होता. गुरुवारी दुपारी फिर्यादी महिलेचा पती घरात नव्हता. त्यावेळी आरोपी राजेश फिर्यादीच्या घरामध्ये घुसला. घरामध्ये येऊन आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.