Maval News : शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणणा-या वडगाव पंचक्रोशीतील 56 मंडळांचा सन्मान

एमपीसी न्यूज – वडगाव व पंचक्रोशीतील शिवज्योत आणणाऱ्या शिवभक्तांचा सह्याद्री फौंडेशन व सुनिल भाऊ ढोरे मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रत्येक मंडळांना शिवज्योत, चार झेंडे, मेडिकल साहित्य, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा अशा 56 मंडळांना भेट देण्यात आली.

यावेळी माजी अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, मंगेश काका ढोरे, गंगाराम ढोरे, शिवव्याख्याते रवींद्र यादव, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुनिल भोंगाडे,युवा नेते दिलीप राक्षे,माजी उपसरपंच नितीन मु-हे, चंद्रकांत ढोरे, अनिल मालपोटे माजी उपसरपंच विशाल वहिले, गणेश पंडीत ढोरे,भाऊसाहेब कराळे, निलेश म्हाळसकर, अतुल मराठे आदी उपस्थित होते.

या सन्मान सोहळ्यात शिवव्याख्याते रविंद्र यादव यांनी शिवव्याख्यान देत त्यांचे शिवरायांच्या इतिहासाचे दाखले सर्वांनी अनुभवले. पंचक्रोशीतील शिवज्योत आणणा-या मंडळाचा सन्मान करण्यात आला. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश खांडगे यांची निवड झाल्याबद्दल सह्याद्री फौंडेशनचे संस्थापक व वडगाव नगरपंचायतचे नगरसेवक सुनिल ढोरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खांडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पै तुषार मोहन येवले यांची मावळ केसरी म्हणून निवड झाल्याबद्दल नगरसेवक व फौंडेशन संस्थापक सुनील ढोरे व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सह्याद्री फौंडेशनचे अध्यक्ष अविनाश चव्हाण, संचालक प्रवीण ढोरे, गणेश म्हाळसकर, मयुर गुरव, शरद ढोरे,बंटी वाघवले, सचिन वाडेकर, विकी ढोरे, विशाल चव्हाण, जयदीप ढोरे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.