Pimpri : अग्रवाल समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुरुवारी गुणगौरव सोहळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील निवासी अग्रवाल समाजाचे गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य मिळविणार्‍यांचा गुणगौरव सोहळा  चिंचवड येथील अग्रसेन समाज भवन येथे 30 मे रोजी सांयकाळी पाच वाजता करण्यात आले आहे.  

शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या माध्यमिक-उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत तसेच ग्रॅज्यूएट व पोस्ट ग्रॅज्यूएट, मेडिकल, इंजीनियरिंग परीक्षा आणि अन्य डिग्री डिप्लोमा परीक्षेत उज्ज्वल यश मिळविणार्‍या अग्रवाल समाजाच्या  विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह आणि प्रशस्ति पत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.  या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन पिंपरी-चिंचवडचे प्रसिद्ध एस्सेन ग्रुप ऐश्‍वर्यम ब्रँडचे चेअरमन भीमसेन अग्रवाल व वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रेमचंद्र अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी अग्रवाल कुंटुंबास भीमसेन अग्रवाल आणि प्रेमचंद्र अग्रवाल यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या गुणवंत मुलांचे नाव त्वरीत नोंदवावे. नाव नोंदणीसाठी 9673988770, 9822836056, 7020316009, 7020206284 या नंबर वर संपर्क करावा. तसेच या गुणगौरव सोहळ्यात निशुल्क हेल्थ चेकअप शिबिराचे आयोजन भोसरी येथील ओम हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.   कार्यक्रमास येणार्‍या सर्वांचे येथे मोफत हेल्थ चेकअप केले जाणार आहे, अशी माहिती ओम हॉस्पिटलचे डॉक्टर अशोक अग्रवाल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.