Hinjawadi News : पती आणि सासुला समोरासमोर दारु पिता येत नाही म्हणून सुनेचा छळ 

एमपीसी न्यूज – पती आणि सासुला समोरासमोर दारु पिता येत नाही म्हणून सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती व सासु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हेलॉसिटी सोसायटी, बावधन येथे 27 फेब्रुवारी 2021 ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. 

विवाहित महिलेनं याप्रकरणी मंगळवारी (दि.08) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अनिकेत जयंत जाधव (वय 34, रा. नातु बाग, सदाशिव पेठ पुणे) व एका महिलेविरोधात भारतीय दंड विधान कलम 498 अ, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती व सासु यांना समोरासमोर बसून दारू पिता येत नाही. या कारणावरून फिर्यादी विवाहित महिलेचा दोन्ही आरोपींनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, वारंवार टोचून बोलत क्रुर वागणूक दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.