Vadgaon Maval News : वडगाव भाजपचे महाबळेश्वर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपकडून संधी

एमपीसी न्यूज – कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने भाजपाचे दिवंगत माजी खासदार स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष अनंता कुडे व नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक भूषण मुथा यांच्या संयोजनातून वडगाव मावळ भाजपचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर महाबळेश्वर येथे पार पडले.

भाजपाने संघटनात्मक बांधणी, क्रियाशील कार्यकर्ता आणि पक्षाशी निष्ठावंत घराणे या धोरणानुसार चार वर्षांत पाच कार्यकर्त्यांना स्विकृत नगरसेवकपदाची संधी दिली. यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चाचे सचिव संतोष दाभाडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम  हे उपस्थित होते. यावेळी वडगांव शहरातून भाजपचे गटनेते दिनेश ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण,किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, खंडू भिलारे, संतोष म्हाळसकर, शरद मोरे, ॲड विजय जाधव,प्रसाद पिंगळे,शामराव ढोरे,रवींद्र काकडे, माजी अध्यक्ष,बंडोपंत भेगडे, भरत म्हाळसकर, पत्रकार सुदेश गिरमे,नारायण ढोरे,किरण भिलारे, माजी सरपंच नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे,प्रमोद म्हाळसकर सुशीलकुमार भिडे,

मधुकर वाघवले, नंदकुमार चव्हाण, बाळासाहेब कुडे, पंढरीनाथ भिलारे,सुरेश भंडारी,अंबादास बवरे, वसंत पगडे,सुरेश भंडारी,सोमनाथ काळे, मधुकर गुरव, नामदेव भसे, नाथा घुले,श्रीधर चव्हाण,रविंद्र म्हाळसकर, विठ्ठल घारे,प्रदीप बवरे,यदुनाथ चोरघे,योगेश म्हाळसकर, नामदेव वारींगे, शेखर वहिले,मकरंद बवरे,मोरेश्वर पोफळे, अमोल पगडे,संदीप म्हाळसकर, हरिष दानवे,विनायक चिखलीकर,विराज हिंगे, वसंत तुमकर,निखिल तारू आदींसह  कार्यकर्ते उपस्थित होते.

गतवेळच्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीत एकूण 17 पैकी 7 व एक अपक्ष असे आठ प्रभागात भाजपाचे कमळ फुलले तर नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यानंतर मात्र भाजपाने संघटनात्मक बांधणी व क्रियाशील कार्यकर्ता आणि पक्षाशी निष्ठावंत घराणे या धोरणानुसार चार वर्षांत 5 कार्यकर्त्यांना स्विकृत नगरसेवकपदाची संधी देऊन शहर भाजपाच्या पक्षकार्यातील उत्साह कायम ठेवला आहे.

दोन दिवसीय शिबिरामध्ये,चार सत्रांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांतर्गत अनुक्रमे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्टाचे कार्यवाहक व  निर्मलवारीचे प्रमुख संदिप जाधव, तसेच  संघाचे कार्यवाहक हेमंत हरहरे आणि  सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कार्यकर्त्यांच्या अभ्यासवर्गाला संबोधित करत असताना,पक्षीय संघटनात्मक काम,आपल्याकडे असलेल्या पदाची जबाबदारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत निर्माण केलेल्या विविध योजना, या सर्व गोष्टीचा आढावा देण्यात आला.

मावळ तालुक्याची ओळख ही जनसंघाचा कार्यकर्ता ही असुन धाडस करण्याची धमक ही फक्त मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांत आहे संघ हा विचार असुन कार्यकर्त्यांनी नेतृत्व, कर्तृत्वाचा आलेख निर्माण करण्यासाठी संघटनात्मक काम करा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह हेमंत हरहरे यांनी केले

शिबिराचे अध्यक्ष मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी सांगितले की विचार कधी ढळत नाही ते कार्यकर्ते भाजपाचे असुन भाजपाचे कार्यकर्ते समाज हित व परिवर्तनाचे काम करणारे आहे असे सांगुन संघटनात्मक कार्यकर्त्यांची कार्यशाळा चालविण्याचे काम  या पुढे अखंडपणे चालू ठेऊ, हेच या शिबिराचे वैशिष्ट्य ठरेल.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष अनंता कुडे व नगरपंचायतचे  स्वीकृत,नगरसेवक भूषण मुथा यांचे संयोजनातून हे शिबिर आयोजित केले होते

 Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

प्रास्ताविक नगरसेवक प्रविण चव्हाण व भूषण मुथा यांनी तर सूत्रसंचालन शहराध्यक्ष अनंता कुडे व माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी केले  तर आभार गटनेते दिनेश ढोरे व दीपक भालेराव यांनी मानले आलेल्या सर्वांचे स्वागत युवा मोर्चा चे अध्यक्ष विनायक भेगडे व शंकर भोंडवे यांनी केले.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.