Crime News : पत्नीवर संशय घेत केले कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पत्नीच्या मोबाईलवर मेसेज आल्याने तिच्यावर (Crime News) संशय घेऊन पतीने कोयत्याने वार करत पत्नीला जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे घडली.

शुभम अरविंद भोकसे (वय 27, रा. कुरकुंडी, ता. खेड) असे मारहाण करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्या 25 वर्षीय जखमी पत्नीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

IND vs AUS : रोहित, जडेजा आणि अक्षरमुळे भारतीय संघ मजबूत अवस्थेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो शुभम याने पाहिला. (Crime News) त्यावरून त्याने फिर्यादीवर संशय घेऊन कोयत्याने तिच्यावर वार केले. यात फिर्यादी जखमी झाल्या आहेत. त्यानंतर शुभम याने शिवीगाळ करून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.