Karnatak : कर्नाटक सरकारच्या उद्याच्या शपथविधीला मी जाणार : शरद पवार

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी विचारले की, कर्नाटक (Karnatak) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल असून उद्या शपथ विधी होत आहे.तुम्ही शपथ विधी कार्यक्रमास जाणार का ?

त्या प्रश्नावर ते म्हणाले की, कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ विधी सोहोळ्याचे मला निमंत्रण आले असून मी उद्या शपथ विधी कार्यक्रमास जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune : पवना धरणग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी; धरणग्रस्तांना मिळणार चार एकर जागा

तसेच ते पुढे म्हणाले की, कर्नाटक (Karnatak) राज्यातील निकालामुळे या देशाला आता राजकीय सत्ताबदल हवा आहे. त्यामुळे आम्ही असा विचार करतोय की, समविचारी पक्षांनी एकत्र यावं आणि लोकांना पर्याय द्यावा. त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे.

नितीश कुमारांनीही तीच इच्छा व्यक्त केली आहे. त्या संदर्भात आम्ही सर्व एकत्र लवकरच भेटणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Thergaon : विश्वासाने नेलेली थार गाडी परत न करता फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.