India Corona Update : गेल्या 24 तासांत 36,652 नवे रूग्ण, बाधितांची संख्या 96 लाखांवर

एमपीसी न्यूज : भारतात गेल्या 24 तासांत 36 हजार नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 96 लाख 08 हजार 211 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधित रूग्णांपैकी 90 लाख 58 हजार 822 एवढे रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एकूण बाधित रूग्णांपैकी देशात सध्या 4 लाख 09 हजार 689 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 512 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशात आत्ताप्रर्यंत 1 लाख 39 हजार 700 रूग्ण दगावले आहेत. देशात दिवसेंदिवस बरे होणा-या रूग्णांची अधिक असून, गेल्या 24 तासांत 42 हजार 533 बरे झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

मागील 24 तासांत देशभरात 11 लाख 57 हजार 763 नमूने तपासण्यात आले आहेत. आत्तापर्यंत देशभरात 14 कोटी 58 लाख 85 हजार 512 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबबात आकडेवारी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून देशात दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णापेक्षा अधिक आहे. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची निरंतर वाढ कमी होताना दिसत आहेत. सध्या देशात 4 लाख 09 हजार 689 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 94.28 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.