Pune : साधूच्या वेशातील कुख्यात दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अहमदनगर येथील चांभुर्डे गावातून ताब्यात घेतले आहे.

रविंद्र उर्फ रव्या अशोक काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार असलेला कुख्यात दरोडेखोर रविंद्र उर्फ रव्या अशोक काळे हा साधूच्या वेशात दाढी वाढवून अहमदनगर येथील चांभुर्डे गावात राहत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांभुर्डे गावात जाऊन छापा घातला असता दरोडेखोर रविंद्र साधूच्या वेशात दिसून आला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपी हा कुख्य़ात दरोडेखोर असून दरोड्यादरम्यान तो निर्दयीपणे लोकांना मारहाण करून जीवे देखील मारत होता व गेल्या कित्येक वर्षांपासून या फरार आरोपीचा पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

आरोपीस शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.