IND VS AUS : ऑस्ट्रेलियाने सामना तर भारताने जिंकली मालिका

एमपीसी न्यूज – राजकोट येथे झालेल्या (IND VS AUS) अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 धावांनी विजय मिळवला. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने आधीच 2 सामने जिंकत मालिका खिशात घातली होती. या मालिकेत भारताचे ऑस्ट्रेलियाचे 2-1 असे समीकरण राहिले.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना, डेव्हिड वार्नर 56, मिचेल मार्श 96, स्टीवन स्मिथ 74 आणि लुबुस्चेन 72 यांच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला 7  गड्यांच्या मोबदल्यात 352 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यावेळी मिचेल मार्शचे शतक 4 धावांनी हुकले.

प्रत्युत्तरात भारताला कर्णधार रोहित शर्मा 81 धावा, विराट कोहली 56, श्रेयश अय्यर 48, रवींद्र जडेजा 35 आणि के.एल 26 असे 50 षटकात सर्वबाद 286 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या वतीने ग्लेन मॅक्स्वेल याने 10 षटकात 40 धावा देत महत्त्वपूर्ण 4 फलंदाज बाद केले.

Talegaon : ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी लाच घेणारा लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

तर, भारतच्या वतीने जसप्रीत बुमराह याने 3 गडी बाद केले. तर कुलदीप यादवने 2 गाडी बाद केले. सामनावीर ग्लेन मॅक्स्वेल (IND VS AUS) तर मालिकावीर शुभमन गिल ठरला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.