India Corona Update : देशात मार्च 2020 नंतरची सर्वात निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 7 हजार 081 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 7 हजार 469 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 83 हजार 913 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही मार्च 2020 नंतरची सर्वात निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 47 लाख 26 हजार 049 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 41 लाख 78 हजार 940 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.38 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 264 रुग्ण दगावले असून, देशात आजवर 4 लाख 77 हजार 422 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 66 कोटी 41 लाख 09 हजार 365 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत 12 लाख 11 हजार 977 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

लसीकरणात देश आघाडीवर असून आजवर 137 कोटी 46 लाख 13 हजार 252 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 76 लाख 54 हजार 466 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.