India Corona Update: रेकॅार्ड ब्रेक ! गेल्या 24 तासांत विक्रमी सहा लाख चाचण्या, 55,079 रुग्णांची वाढ; रूग्णसंख्या 16 लाखांच्या पुढे

India Corona Update: A record six lakh tests in the last 24 hours, an increase of 55,079 patients; The number of patients is more than 16 lakh जगात सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशात अमेरिका आणि ब्राझील नंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागतो.

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या यासह सर्वाधिक रुग्ण संख्याही नोंदवण्यात आली. देशात गुरुवारी तब्बल 6,24,588 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. तर 55,079 रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आजवरची एका दिवसातील सर्वांत मोठी वाढ आहे.

देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 16,38,871 इतका झाला आहे. त्यापैकी 5,45,318 सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर जवळपास 10,57,806 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

मागील 24 तासांत देशात 779 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून देशात आजवर 35,747 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती जाहीर केली आहे.

देशात दिवसेंदिवस कोरोना चाचणीची संख्या देखील वाढत आहे. गुरुवारी (दि.30) तब्बल 6,24,588 नमुने तपासण्यात आले. एका दिवसात करण्यात आलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. देशात आजवर 1,88,32,970 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत माहिती जाहीर केली आहे.

जगात सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशात अमेरिका आणि ब्राझील नंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागतो. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यू दर सर्वांत कमी असल्याचे दिसून आले आहे. देशात सध्याच्या घडीला 2.21 टक्के मृत्यूदर आहे.

देशात एका दिवसात सहा लाखाहून अधिक म्हणजे 6,24,588 चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील चाचणी क्षमता वाढवून ती दिवसाला दहा लाख एवढी करण्याचा मानस असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना महामारीचा शोध, चाचणी आणि उपचार या तीन टप्प्यात करणार असल्याचे आरोग्य आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.