India Corona Update: कोरोना बाधितांची संख्या नऊ लाख पार; गेल्या 24 तासांत 28,498 नवे रूग्ण, 553 जणांचा मृत्यू

India Corona Update: Number of Corona victims cross nine lakh; In the last 24 hours, 28,498 new patients, 553 died गेल्या 24 तासांत 553 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून आजवर 23,727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत असून गेल्या 24 तासांतील 28,498 नव्या कोरोना रूग्णांच्या वाढीबरोबर देशातील एकूण रूग्णांची संख्या 9,06,752 एवढी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 9,06,752 एकूण रूग्णांपैकी 3,11,565 सक्रिय रूग्ण आहेत तर 5,71,460 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या 24 तासांत 553 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून आजवर 23,727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील रूग्णांची संख्या वाढत असली तरी रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील 24 तासांत देशात 17,989 जण कोरोना मुक्त झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 63.02 टक्के झाली आहे.

देशभरात 13 जुलैपर्यंत 1,20,92,503 नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यातील 2,86,247 नमूने काल (सोमवार) तपासण्यात आले असल्याची माहिती ‘आयसीएमआर’ कडून देण्यात आली आहे

सर्वाधिक रुग्ण असलेली पाच राज्य ( कंसात मृत्यू )
महाराष्ट्र – 2,60,924 (10,482)
तामिळनाडू – 1,42,798 (2,032)
दिल्ली – 1,13,740 (3,411)
गुजरात – 42,722 (2,055)
कर्नाटक – 41,581 (757)

रेमडेसिवीर व टोसिलिझुमाब या औषधांचा वापर कोरोनावरील उपचारासाठी करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी त्याच्या चांगल्या परिणामांपेक्षा वाईट परिणाम अधिक आहेत.

परिणामी त्यांचा वापर काळजीपूर्वक केला जावा, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषद व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांनी दिला आहे. या औषधांची मात्रा योग्य प्रमाणात देणेच आवश्यक आहे. त्याच्या जास्त वापराने आरोग्यास धोका निर्माण होतो असे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.