Uday Samant : आमदार टीकविण्यासाठीच विरोधकांकडून सरकार पडण्याच्या वल्गना – उदय सामंत

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार असून सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. ही संख्या वाढून 172 वर जाईल. (Uday Samant) सरकार मजबूत आहे. केवळ उर्वरित आमदार टीकविण्यासाठीच विरोधकांकडून सरकार पडण्याच्या वल्गना केल्या जात असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

चिंचवड ऑटो क्‍लस्टर येथील प्रदर्शनाला मंत्री सामंत यांनी आज (सोमवारी) भेट दिली. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, बाळासाहेबांची शिवसेनेचे युवासेना प्रमुख विश्वजित बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Ujjwal Kesarkar : राज्य शासनाला जास्तीत जास्त 8 दिवसांत प्रभाग रचना तयार करता येईल : उज्जवल केसकर

मंत्री सामंत म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कचाट्यात सापडली होती. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याची वेळ आल्यास शिवसेना हे दुकान बंद करेन, असे सुनावले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. या निमित्ताने अद्यापही उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विळख्यातून बाहेर पडायला तयार नसल्याचे दिसते.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना वापरलेले शब्द चुकीचे आहेत. त्याचे मी समर्थन करत नसल्याचे सांगत मंत्री सामंत म्हणाले, (Uday Samant) आर्थिक दुर्बल घटकांतील लोकांच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आनंदात भर घालणारा आहे. चाकण, तळेगाव दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचे काम चालू आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास यावर मार्ग निघेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.