Tata IPL 2022 : ‘विवो’ ऐवजी आता ‘टाटा’ आयपीएल, आयपीएल चे प्रायोजकत्व टाटाकडे

एमपीसी न्यूज – विवोचा दोन वर्षांचा करार शिल्लक असताना टाटा कंपनीला आयपीएलचे टायटल स्पॉन्सर बनवण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या प्रशासकीय समितीने मंगळवारी टाटा कंपनीचे नाव आयपीएलचे अधिकृत प्रायोजक म्हणजेच ‘मेन स्पॉन्सर’ म्हणून निश्चित केलंय.

लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक असतानाच कंपनीने करारामधून माघार घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे या लीगचे नाव आता ‘टाटा आयपीएल’ असेल. नव्याने प्रायोजक शोधण्यासाठी दोन वर्षांनी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र तोपर्यंत टाटा हेच आयपीएलचे मुख्य प्रायोजक असतील असं आयपीएल समितीने म्हटलंय. 2022 आणि 2023 साठी टाटाकडे प्रायोजकत्व असेल.

विवोने 2018 मध्ये वार्षाला 440 कोटी रुपये खर्च करुन टायटल स्पॉनर्सचे हक्क 2024 पर्यंत विकत घेतले होते. मात्र कंपनीने अचानक माघार घेतली आहे. त्यामुळे टाटा कंपनीला आयपीएलचे अधिकृत प्रायोजक्तव देण्यात आले आहे. तसेच, आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठीच्या लिलावाची तारीख ठरली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.