IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात जेसन रॉयच्या जागेवर डॅनिअल सॅम्सला संधी

28 ऑगस्टपासून इंग्लंड आणि पाक यांच्यात T-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. जेसन रॉयच्या अनुपस्थितीत टॉम बँटनला जॉनी बेअरस्टोसोबत सलामीला येण्याची संधी मिळू शकते.

एमपीसी न्यूज – इंग्लंडचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा जेसन रॉय दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धची T-20 मालिका खेळणार नाही. ईएसपीएन या क्रिकेट विषयक चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार जेसन रॉयने आयपीएलमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

जेसन रॉयच्या जागेवर दिल्लीच्या संघात ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज डॅनिअल सॅम्सला संघात स्थान देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी ख्रिस वोक्सनेही आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे दिल्लीने अ‍ॅन्रिच नॉर्ट्जेला संघात स्थान दिलं होतं. यानंतर स्पर्धेतून माघार घेणारा जेसन रॉय हा दुसरा इंग्लिश खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा यूएईत खेळवली जाणार आहे.

28 ऑगस्टपासून इंग्लंड आणि पाक यांच्यात T-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. जेसन रॉयच्या अनुपस्थितीत टॉम बँटनला जॉनी बेअरस्टोसोबत सलामीला येण्याची संधी मिळू शकते.

दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व टीम यूएईत पोहचल्या असून स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सर्व खेळाडू आणि सहकारी यांनी हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.