Akram On IPL: ‘आयपीएल’ जगातील सर्वोत्तम स्पर्धा- वसीम अक्रम

IPL is the best tournament in the world says Wasim Akram आयपीएलचे आयोजन पाहूनच काही वर्षांपासून पाकिस्तान मध्येदेखील पीएसएलचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे.

एमपीसी न्यूज – पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने आयपीएल जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धा असल्याचे म्हटले आहे. आयपीएल आणि पीएसएल मधील सर्वात मोठा फरक दर्शवताना अक्रमने सांगितले की, भारतीय लीगमध्ये गुंतवणूकीची रक्कम पीएसएलपेक्षा अधिक चांगली असते असे तो म्हणाला.

अक्रम म्हणाला की, आयपीएलमुळे नवोदित क्रिकेटपटूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना संधी मिळते. आतापर्यंत आयपीएल मधील अनेक सामने रंगतदार झाले आहेत.

आयपीएलचे आयोजन पाहूनच काही वर्षांपासून पाकिस्तान मध्येदेखील पीएसएलचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. या स्पर्धेत देखील अनेक प्रतिभावंत खेळाडूचा समावेश आहे.

पीएसएलमधील गोलंदाजीचा दर्जा हा आयपीएलपेक्षा चांगला असल्याचे वक्तव्य माजी कर्णधार वसीम अक्रमने केले होते. पण आता मात्र, आयपीएल स्पर्धा ही पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेपेक्षाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम स्पर्धा असल्याची कबुली अक्रमने दिली आहे.

आयपीएल आणि पीएसएलमध्ये खूप फरक आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत या दोन स्पर्धांमध्ये खूपच तफावत जाणवू लागली आहे. आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला जातो. एका संघाचं बजेट 60 ते 80 कोटी इतकं असतं. म्हणजे पीएसएलच्या दुप्पट.

त्यामुळे त्यातून होणारा नफादेखील जास्त असतो. तोच आर्थिक नफा बीसीसीआय देशांतर्गत स्पर्धांसाठी वापरते. म्हणूनच आयपीएल ही जगातील सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा आहे, असे वसीम अक्रम म्हणाला.

आयपीएलमधील खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंचे वैयक्तिक स्तरावर प्रशिक्षक असतात. खेळाडू अशा माजी क्रिकेटपटूंची निवड प्रशिक्षक म्हणून करतात, ज्यांनी आधी त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळेच आयपीएलमध्ये खेळताना खेळाडूंचा उत्साह आणि आत्मविश्वास दुप्पट असतो, असेही अक्रम म्हणाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.